करंजगाव गावाचे लोकजीवन साधे असून शेती हा प्रमुख व्यवसाय असून उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणत घेतले जाते.तसेच कांदा ,गहू .द्राक्षे,सोयाबीन ,टमाटे,कोबी,फ्लावर यांचेही पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.त्यासाठी विक्रीला कांदा मार्केट म्हणून नाशिक, पिंपळगाव बसवंत,सायखेडा , अशा ठिकाणी विक्री केले जातात.त्यातून येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते.